अमळनेर तालुक्यातील मुडी बोदर्डे येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मुडी बोदर्डे येथील विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. १२ रोजी घडली आहे. याप्रकरणी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बोदर्डे येथील तरुण सागर विकास भील (वय २५) हा पत्नीसोबत मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. दि. १२ रोजी त्याने राहत्या घरात स्लॅबच्या कडीला दोरी बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ भरत ईशी हे करीत आहेत.