जळगाव (प्रतिनिधी) – राज्यात महिलांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत असून कोरोना बाधीत उपचार घेणार्या महिलांवरच कोविड विलगीकरण केंन्द्रात अत्याचार करण्यात आल्याच्या दुर्देवी घटना घडत आहेत. याच्या निषेध भाजपा महिला आघाडीतर्फे करण्यात येवून महाविकास आघाडी शासनाने महिला रक्षणाविषयी ठोस पावले उचलून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे कि, राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असून राज्य महिला आयोगाला अध्यक्ष नाही. हिंगणघाटच्या घटनेनंतर आंध्र प्रदेशप्रमाणे महिलांना सुरक्षा व न्याय मिळण्यासाठी गृहमंत्र्यांनी घोषणा केली होती. परंतु योजनेच अंमलबजावणी झालेली नाही.महिलांच्या रक्षणात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल असून असून गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ, उज्ज्वला बेंंडाळे, महापौर भारती सोनवणे, ऍड.सुचेता हाडा, ज्योती पाटील, शैलजा पाटील, दिप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, ज्योती राजपूत, पल्लवी चौधरी, सरीता नेरकर, ज्योती निंभोरे, संगीता वाघूळदे, प्रणाली नेवे आदी पदाधिकारी महिला, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, दिपक सुर्यवंशी, विजय धांडे, सचिन पानपाटील, महेश जोशी, नितीन इंगळे, प्रकाश पंडीत, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, पुरूजित चौधरी, प्रल्हाद पाटील, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदू सोमवंशी, जि.प.सभापती जयपाल बोदडे, केदार देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.