प्रभाग ७ मध्ये वातावरण झाले भाजपमय, उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना पसंती वाढली !
जळगाव शहर महानगरपालिका
जळगाव (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग ७ मध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला असून, प्रभागातील घराघरांत जाऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आपल्या विकासकामांच्या “वचननाम्याचे” (जाहीरनामा) प्रकाशन करून ते मतदारांच्या हाती सुपूर्द केले.

गेल्या काही दिवसांपासून चंद्रशेखर अत्तरदे यांनी प्रभागात वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला आहे. त्यांच्या संयमी आणि विकासभिमुख प्रतिमेमुळे प्रभागातील वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले असून, अत्तरदे यांची पसंती सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांनी केवळ आश्वासने न देता, प्रत्यक्ष कामाचा लेखाजोखा आणि भविष्यातील नियोजनाचे ‘पुस्तक’ (वचननामा) नागरिकांसमोर ठेवले आहे.
वचननामा प्रकाशनावेळी उमेदवार दीपमाला मनोज काळे, अंकिता पंकज पाटील, विशाल सुरेश भोळे, चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. घरोघरी सुरू असलेल्या या प्रचार दौऱ्यात महिलांनी अत्तरदे यांचे औक्षण करून स्वागत केले, तर तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा निर्धार व्यक्त केला. विरोधकांच्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर देत अत्तरदे यांनी प्रत्यक्ष भेटीगाठींतून मतदारांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
“प्रभाग ७ च्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. माझा वचननामा हा केवळ कागद नसून, तो मी प्रभागातील जनतेला दिलेला शब्द आहे. या विश्वासाच्या जोरावर भाजपला मोठ्या मताधिक्याने विजय मिळेल.” — चंद्रशेखर अत्तरदे (उमेदवार, भाजप)










