पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज व सातार्याचे माजी खासदार श्रीमंत छत्रपती. उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस उदयनराजे भोसले समर्थक ग्रुप छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक यांनी उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम पार पाडले. सकाळी छत्रपती राजे संभाजी महाराज चौकातिल संभाजी महाराज यांना माल्यार्पण करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातिल छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून पाचोरा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना बिस्लरी पाणी बॉटल बिस्कीट फळवाटप करण्यात आले. या वेळी श्री छत्रपती उदयनराजे भोसले समर्थक ग्रुपचे सचिन पाटील , रवी ठाकूर , गणेश शिंदे , अनिल भोई , श्याम पाटील , सुनील पाटील , धीरज कुशवाह , पिटु लोणारी, चेतन भोई , गोपाल सोनार, वाय डी पाटील , संजय वाणी , भीमा जाधव आदी उपस्थित होते.