ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत
वावडदे (प्रतिनिधी): जळगाव तालुक्यातील वावडदेनजीक असलेल्या बिलवाडी येथे रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात श्रीमती कविता कोमलसिंग पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.


दिनांक २४ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. उपसरपंच पदासाठी कविता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ही निवड होताच समर्थकांनी आणि ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला.
या निवडीप्रसंगी गावचे सरपंच विनोद (दिनोद) श्रावण पाटील यांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. ही निवड बिनविरोध झाल्यामुळे गावात आनंदाचे वातावरण असून, गावच्या विकासासाठी सर्व सदस्य कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून आले. या निवड प्रक्रियेला ग्रामपंचायत सदस्य पल्लवी समाधान पाटील, धोंडू जगताप, अनिल गुलाब पाटील, रवींद्र हिलाल गोपिळ, सुपडू गुलसिंग गायकवाड, अमोल उमरे, आणि लताबाई महादु पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरचंद्रशेखर प्रकाश वराडे (ग्रामपंचायत अधिकारी) यांनी चोख कामकाज पाहिले. त्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. निवडीनंतर गावातील ग्रामस्थांनी नवनिर्वाचित उपसरपंचांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.









