न्यायालयाकडून २२ पर्यंत कोठडी
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बिलवाडी या गावामध्ये रविवारी दि. १४ रोजी सकाळी २ कुटुंबांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून हाणामारी होऊन एका ५५ वर्षीय इसमाचा खून करण्यात आला होता. तर ११ जण जखमी झाले. सोमवारी सकाळी मृतदेह ताब्यात न घेता गोपाळ कुटुंबीय व ग्रामस्थांनी सुरुवातीला आकाशवाणी चौकात चक्का जाम केला होता. या घटनेत एकूण १० जणांना अटक करण्यात आली आहे. यातील फरार तिघांना न्या. एस. व्ही. मोरे यांच्या कोर्टात हजर केले असता दि. २२ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

या घटनेत एकनाथ निंबा गोपाळ (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला होता. बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या १० वर्षांपासून जुना वाद सुरू आहे. या वादातून हे हत्याकांड घडले आहे. यात सुरुवातीला ७ व नंतर ३ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. घटनेत प्रमुख संशयित रोहिदास पाटील हा सूत्रधार असल्याचा आरोप गोपाळ कुटुंबीयांचा आहे. त्यासाठी त्यांनी सोमवारी आकाशवाणी चौकात चक्का जाम करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी करून नंतर जिल्हाधिकारी व पुढे एसपी कार्यालयात जाऊन पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. यातील ३ फरार रोहिदास काशिनाथ पाटील (वय ५०), कल्पेश बाळासाहेब पाटील (वय २३), संगीताबाई रोहिदास पाटील (वय ४०) यांना बुधवारी दि. १७ रोजी अटक करण्यात आली आहे. श्रीमती एस व्ही मोरे यांच्या कोर्टात हजर केले असता त्यांना २२ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली.









