भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील एका हॉटेलवर बिल देण्याच्या वादातून एकावर पाच ते सहा संशयीतांनी हल्ला केल्याची घटना दिनांक ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयीत अजीमसह सहा अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आजीम शेख व भूषण होंडाळे यांना अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
समाधान अशोक निकम (३३, डॉ. आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ते मित्रांसह नागपूर महामार्गावरील हॉटेलवर जेवणासाठी गेले असता संशयीतानी बिल देण्याच्या कारणावरून वाद घातला. संशयीत अजीम शेखसह त्याच्या साथीदारांनी लाकडी दांडा व लोखंडी रॉडने मारहाण करीत तक्रारदाराचा पाय फॅक्चर केला तसेच डाव्या डोळ्यावर व दंडावरही दुखापत करण्यात आली.
याप्रकरणी संशयीत अजीमसह त्याच्या साथीदारांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या ार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ करीत आहेत.