बीजिंग (वृत्तसंस्था) – कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार सुरु आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजारांपेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. तर ८० हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. अशातच चीनने कोरोनावर लस शोधल्याचा दावा केला आहे. वुहानमध्ये पीपुल्स लिबरेशन आर्मीच्या मेडिकल विशेषतज्ञ शेन वेई यांच्या नेतृत्वाखाली ही लस तयार केली आहे. शेन वेई यांनी याआधीही सार्स आणि इबोलासारख्या धोकादायक व्हायरसवर लस बनवली होती. शेन वेई यांच्या टीमने दिवस-रात्र एकत्र करत कोरोनावर लस बनवली आहे. ही लस शेन वेई यांनी पहिल्यांदा स्वतः घेतली आहे.