रहाता तालुक्यातील दुर्दैवी घटना
नगर (वृत्तसंस्था ) ;- घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या साडेतीन वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून मुलाला घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात चिमुरड्याचा जागेवरच मृत्यू झाला. रक्षाबंधन सणाच्या पूर्व संध्येला ही घटना राहाता तालुक्यातील चितळी गावात घडली.
चितळी ता.राहाता येथील मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर वाकडी रोड काकडाई मंदिरा जवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याचे सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकांवर घरा शेजारील डाळींबाच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबट्या ने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली.बाहेर असलेल्या आजी ने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व व्यक्ती बिबट्याच्या दिशेने धावल्या. मात्र बिबटया न सापडल्याने घरच्यांनी डाळींब व मका शेतात इतरत्र शोध घेतल्या नंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिनीं गवतात रक्त भाबांळ अवस्थेत हा चिमुरडा मिळून आला. त्यांच्या मानेला मोठ्या प्रमाणात जखम झालेली होती जागेवरच गतप्राण झाल्याचे प्रथम दर्शनी नागरिकांनी या वेळी सांगितले त्याला तातडीने पुढील उपचारार्थ श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तो मृत घोषित केले.