कन्नड तालुक्यातील भाबंरवाडी येथील घटना
कन्नड ;- तालुक्यातील भाबंरवाडी गावातील आनंद महाराज यांच्या आश्रमाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना घडली आहे. या मुलावर बिबट्याने हल्ला करत त्याला आश्रमाजवळ असलेल्या नाल्यात फरपटत नेऊन ठार केल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. ऋषिकेश विलास राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाबंरवाडी येथील आश्रमाचे आनंद महाराज यांच्या आई आश्रमात आल्या आहेत. त्या ऋषिकेशच्या घरी जेवायला आल्या होत्या. रात्री जेवण झाल्यानंतर ऋषिकेश आनंद महाराज यांच्या आईंना सोडण्यासाठी आश्रमात गेला होता. यावेळी आनंद महाराज देखील नियमितप्रमाणे फिरायला गेले होते. त्यामुळे महाराज येईपर्यंत थांब असे त्यांच्या आईने ऋषिकेशला सांगितले. तेवढ्यात लघुशंकेसाठी गेलेला ऋषिकेश बराच वेळ परतला नाही.
यानंतर महाराज येताच त्यांनी ऋषिकेशच्या घरी कळवले. कटुंबाने रात्रभर शोध घेतल्यानंतर त्याचा शोध लागला नाही. सकाळी शोधल्यावर ओढत नेल्याच्या खुणांवरून ऋषिकेश आढळून आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच वैद्यकीय अधिकारी सुरेंद्र सुर्यवंशी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र पवार, धीरज चव्हाण, रवींद्र ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बिबट्याने हल्ला तरुणाचा जीव घेतल्याने भांबरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.तपास साहयक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलीस हेड कॉ . धिरज चव्हाण, रविद्र ठाकुर करत आहे.