जळगाव शहरातील बिबा नगर येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील बिबा नगर येथे दोन महिन्यांपूर्वी नवीन घरात राहण्यासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. यासंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
समाधान रमेश शिरसाठ (वय-३२, रा. डांगरी ता.अमळनेर ह.मु. बिबा नगर, जळगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, चार विवाहित बहिणी, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होता. (केसीएन)समाधान शिरसाट याने घरात सर्वजण झोपलेले असताना राहत्या घरात गळफास घेतली. ही घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात आल्याने उघडकीला आले आहे. दरम्यान शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या मदतीने त्यांना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले.
आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.