रेल्वे अधिकाऱ्यांशी मंत्री महाजन, खा. वाघ यांनी केली चर्चा
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील भुसावळ रेल्वे विभागीय कार्यालयात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खा. स्मिता वाघ, विवीध आमदारांनी बैठक घेतली. बैठकीत, विविध रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, भुसावळ बसस्थानक हे समोरील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
भुसावळ विभागीय कार्यालयात दि. २३ जून, रविवारी रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ, आ. संजय सावकारे,आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंद्रकांत पाटील यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन सुनील कुमार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, वरिष्ठ विभागीय अभियंता समन्वय तरुण कुमार यांच्याशी विभागातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यात भुसावळ बसस्थानक समोरील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. छत्रपती शाहू महाराज-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस आणि देवळाली-भुसावळ मेमूच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे. ट्रेन क्रमांक १७०६३/१७०६४ मनमाड- सिकंदराबाद- मनमाड अजंता एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.(केजीएन) भुसावळ कॉर्ड लाईन येथून जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसला थांबा देण्यात येईल. पाचोरा-जामनेर-नवीन ब्रॉडगेज लाईन आणि त्यासाठी भूसंपादन यावर प्राथमिक चर्चा करण्यात आली.
विविध रेल्वेच्या पुलाखालील रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या आहे. पावसाळ्यात त्याबाबत काळजी घेण्यात यावी त्यासाठी चर्चा झाली.(केजीएन)भुसावळ येथे गती शक्ती कार्गो टर्मिनल आणि सावदा माल गोदामात कव्हर शेडची व्यवस्था करावी असे सुचविण्यात आले. सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
०००००००००००००