वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत. त्यापैकी ३१९ कॅमेरे बाजारपेठ, तर १२३ कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, ३६० अंश व नाईट मोडवर सुस्पष्ट चित्रीकरण हे नवीन कॅमेऱ्यांचे वैशिष्ट्य असेल. शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे पोलिसांसाठी मोठे सहायकारी ठरणार असल्याची माहिती भुसावळचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.
येथे बसणार सीसीटीव्ही कॅमेरे
शहर पोलिस ठाणे हद्द : हंबर्डीकर चौक, ओकारेश्वर मंदिर,महाराणा प्रताप चौक, न्यायालय परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस वसाहत, सेंट अलॉयसेस हायस्कूल, पंचमुखी हनुमान मंदिर, वाल्मीक नगर, कुंभारवाडा, मरिमाता मंदिर, आराधना कॉलनी, लोणारी हॉल, भोई नगर, स्वामी विहार दत्त नगर, काटेचा कॉलेज, काटेचा स्कूल, पालिका परिसर, सेंट्रल रेल्वे स्कूल, नारखेडे विद्यालय, राहूल नगर, ताप्ती क्लब, रेल्वेन नॉर्थ कॉलनी, महात्मा फुले नगर.
बाजारपेठ पोलिस ठाणे हद्द : खडका चौफुली , रजा टॉवर,बसस्थानक, नाहाटा चौक, शिवाजी नगर चौक, वांजोळा रोड, मातृभूमी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अमरदीप चौक, बाजारपेठ पोलिस ठाणे चौक, स्टेशन चौकी, पांडुरंग टॉकीज, एसबीआय शाखा, वाल्मीक नगर चौक, मोटुमल चौक, दीनदयाल नगर, आनंद नगर (एसबीआय), सिंधी कॉलनी गेट, पुंडलिक बन्हाटे शाळा जामनेर रोड, श्रद्धा नगर चौक, डीवायएसपी कार्यालय, पंधरा बंगला बुद्ध विहार इत्यादी महत्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत.