नोव्हेंबर २०२४ पर्यंत मागील उत्पन्नापेक्षा ३.९६ टक्के अधिक उत्पन्नाची नोंद यात करण्यात आली आहे. सन २०२३- २४ च्या तुलनेत ७.४७ टक्क्यांनी या महसूलमध्ये वाढ झाली आहे. भुसावळ विभागाच्या खानपान सेवा उत्पन्नात झालेली वाढ विविध स्थानकांवर पुरवलेल्या अतिरिक्त कॅटरिंग सुविधांमुळे शक्य झाल्याचे म्हटले जात आहे.
याशिवाय, विविध रेल्वेस्थानकांचे पुनर्विकासात काम सुरू आहे. त्यामुळे या स्थानकांमध्ये लक्षणीय बदल झाला आहे. या सुशोभीकरण करण्यात आलेल्या नव्या स्थानकात आता नव्या डिझाइनचे कॅटरिंग स्टॉल्स प्रस्तावित करण्यात आले आहेत. नवीन मॉड्यूलर कॅटरिंग युनिट्स प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करण्यासाठी तयार करण्यात येत आहेत. हे कॅटरिंग स्टॉल्स अग्नि- प्रतिरोधक साहित्य आणि विद्युत सुरक्षेच्या सुविधांसह सुसज्ज असतील, असे डीआरएम इति पांडे यांनी सांगितले.