भुसावळ (प्रतिनिधी) :- येथील रेल्वे स्थानकावर मंगळवारी दि. २८ रोजी “स्टेशन महोत्सव” मंडळातर्फे प्रथमच आयोजित करण्यात आला होता. येणाऱ्या पिढ्यांना स्थानकांचे ऐतिहासिक संदर्भ कळावेत हा स्टेशन महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. स्थानक महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना स्थानकांच्या इतिहासाची जाणीव करून देणे, रेल्वे स्थानकांच्या स्थापनेशी संबंधित या विविध उपक्रमांचा मुख्य उद्देश लोकांचे रेल्वे स्थानकांशी असलेले नाते दाखवून देणे हा आहे. याप्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे व सर्व अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) कौशलेंद्र कुमार, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस. काझी, अधिकारी, सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी, कर्मचारी व शाळकरी मुले व कर्मचारी उपस्थित होते. महोत्सवाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही. एस. वडनेरे यांनी केले. “स्टेशन महोत्सव” यशस्वी करण्यासाठी कार्मिक विभाग, यांत्रिकी विभाग, संचालन विभाग, वाणिज्य विभाग, अभियांत्रिकी विभाग, एस. अँड टी विभागाने प्रयत्न केले.