डॉ. इमितप्रभाजी म. सा. यांचे प्रतिपादन
सध्याच्या युगात प्रत्येक मनुष्य हे आपल्याजवळी घर, जमिन, संपत्तीसह अन्य भौतिक रत्नांची प्राप्ती व सुरक्षा करण्यातच आपला वेळ घालवत असल्याचे दिसतात. या भौतिक वस्तु मनुष्याला अध्यात्मिकतेपासून परावृत्त करुन चारित्र्यशील होऊ देत नाहीत. इंद्रियांवर नियंत्रण ठेऊन चांगले ज्ञान, श्रद्धा व विवेक पूर्ण आचरणातूनच सम्यक दर्शनासाठी समकित रत्नाची प्राप्ती केली पाहिेजे, ते सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित धर्माराधना करावी, कारण तेच आपल्या प्राणज्योती सोबत शाश्वत असते. त्यासाठी आलाभ, सलाभ, सम्मान, दान, वंदना, नमस्कार ह्या गुणांचा कृतिशील अंगिकार करावा, यातूनच धर्माप्रती समर्पण शुद्धभाव निर्माण होतो. असे महत्वपूर्ण विचार श्रावक-श्राविकां समोर प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी धर्मसभेत व्यक्त केले.
क्रोध व द्वेष हे कर्माचे मूळ बीज आहे. ईच्छा, लोभ, लालसा, कामना, अभिलाषा ही क्रोधाची मूलस्त्रोत आहे. दुसऱ्यांचे दु:ख पाहून आपल्याला सहवेदना जाणवणे आणि त्यातून एखादी कृती घडणे म्हणजे चांगले कर्म होय. टिव्ही, मोबाईल, सिनेमा पाहण्यासाठी तासनतास घालवितो, मात्र धर्माप्रती कार्य करण्यासाठी वेळेचा बहाना आपण करतो. भौतिकतेमुळे निर्माण झालेला क्रोध भाव हाच मनुष्याला धर्मापासून दुर करत आहे. कुठलीही गोष्ट आपण धरुन ठेवतो ती सोडणे शिकले पाहिजे. ज्ञानी पुरूषांप्रती क्रोध ठेवला तर तो प्रशस्त राग असेल तर ज्ञानयुक्त राग प्रत्येकाने ठेवला पाहिजे. क्रोधचा त्याग केला तरच मनातील द्वेष भावना संपते आणि मनुष्य सिद्ध व बुद्ध होत असल्याचे श्रावक-श्राविकांना प. पू. निलेशप्रभाजी म.सा. यांनी सांगितले.