जळगाव (प्रतिनिधी) – येथील निमखेडी शिवारात अज्ञात भिक्षुकाचा शुक्रवारी दि. १६ ऑक्टोबर रोजी मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
येथील तालुका पोलीस स्टेशनचे साहेबराव पाटील याना माहिती मिळाली होती. त्यानुसार, सत्यम पार्क परिसरात असलेल्या नाल्यालगत असलेल्या शेतात कडुनिंबाच्या झाडाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे, या खबरीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अंदाजे ६५ वर्षाचा इसम असून त्याची अद्यापि ओळख पटलेली नाही. तो काही दिवसांपासून परिसरात फिरत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.