जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील भिरूड परिवारातर्फे शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील निवासी संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाच्या सुरूवातीला रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड व सौ. मंजुषा भिरूड, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील, रजीस्ट्रार प्रमोद व सौ. ज्योत्स्ना भिरूड, लेखापाल योगेश व सौ. नूतन पाटील, विकास व सौ. संगीता बेंडाळे, किशोर व सौ. किर्ती झांबरे, एन.जी. चौधरी व सौ. स्मिता चौधरी, गोपाळ व सौ. भोळे या दाम्पत्यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांची महाआरती करण्यात आली. यावेळी प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, जगन्नाथ भिरूड यांच्यासह परिसरातील रहिवासी उपस्थित होते. याप्रसंगी संत गजानन महाराज यांचे भजनगीत सादर करण्यात आले. तसेच भाविकांनी पिठलं, भाकरी प्रसादाचा लाभ घेतला.









