यावल (प्रतिनिधी) : शहरात वाणी गल्लीमध्ये शरद जीनसी यांचे घराची भिंत संततधार पावसामुळे कोसळून घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह घरगुती वापराचे साहित्य व किरकोळ स्वरूपाचे आर्थिक नुकसान दिनांक १० ऑगस्टला रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास झाले. जीन्सी परिवाराला प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शरद जिन्सी हे नेहमीप्रमाणे संध्याकाळी बाहेर गेलेले होते. त्यांच्या पत्नी शोभना जिन्सी या घरात स्वयंपाक करीत होत्या. मात्र स्वयंपाक खोलीकडील भागाकडे कुठलेही नुकसान न झाल्यामुळे शोभना या बालंबाल बचावल्या. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले, गावातील प्रमुख व्यक्तींनी रात्री तात्काळ भेट दिली