जळगाव ( प्रतिनिधी ) – रामेश्वर कॉलनी परिसरात कौटुंबिक वादात भावावर दुसऱ्या भावानेच चाकूने वार करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेच्या फिर्यादीवरून तिच्या जेठावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनी परिसरात सचिन सुरेश सपकाळे हे पत्नी रेणूदेवी सपकाळे यांच्यासह वास्तव्याला आहे. त्यांच्या शेजारी भाऊ विशाल सुरेश सपकाळे देखील कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरेश सपकाळे हा भाऊ सचिन सपकाळे यांच्या घरी येवून जुन्या कौटुंबिक वादातून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सुरेशने हातातील चाकू सचिनच्या डोक्यावर वार करून जखमी केले रेणूदेवी सपकाळे यांना मारहाण केली. दोघांवर जिल्हा शासकीय वैदृयकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ११ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहेत.