मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – आजारपणात वडील गमावलेल्या चौगावच्या दोन भावांनी गरिबीवर मात करत मेहनतीने पोलीस खात्यातील नोकरी मिळवली आहे
चोपडा तालुक्यातील चौगाव येथील गरिब कुटुंबात जन्मलेल्या, बापाचे छत्र हरपलेल्या विलास कोळीचे वडील सिताराम कोळी पैशाने नाही पण मनाने खुप श्रीमंत व्यक्तिमत्व होते. गावात आदराने त्यांना लोकं “अण्णा ” म्हणत होते. अण्णा प्रत्येकाच्या सुख दुखात नेहमी पुढे असायचे. 2015 साली दिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले भरत ,विलास आणि समाधान कोळी. यांनी जिद्द ठेवत काहितरी करुन दाखवायचे असा निश्चय केला होता . गरिबीमुळे काम केल्याशिवाय पर्यायच नव्हता. दिवसा काम आणी रात्री अभ्यास हेच त्यांनी डोळ्यासमोर ठेवले होते. भरत कोळीवर घराची सर्व जबाबदारी होती. तो आणी विलास चिकाटीने अभ्यास करु लागले.
भरत कोळी .2016 या वर्षात पोलीस झाला.आज तो औरंगाबादला नोकरी करतो . विलासही चिकाटीने प्रयत्न करत होता. विलासला भरत कोळीचे मार्गदर्शन मिळाले. भरत कोळीनेदेखील बापासारखे लहान भावांकडे लक्ष ठेवले.आता विलासलाही यश आले.तो लवकरच खाकी वर्दीत दिसणार आहे. भरत कोळी व विलास कोळी यांनी दाखवून दिले की , जिद्द असली की माणुस काहीही करु शकतो. गावात या दोन भावांचे कौतुक होत आहे.