जळगाव (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथे एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी दि. १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वराडसिम येथील संतोष घोरपडे (वय ३१), चंद्रकांत झाडखंडे (वय ५०), जगन्नाथ इंगळे (वय ४६), राणीबाई पाटील (वय ६० ), युवराज मोरे (वय ५०) यांच्यासह आणखी चार जणांना दैनंदिन कामकाजासाठी गेले असता पहाटे ६ वाजेच्या सुमारास एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला. यामुळे गावात दहशत पसरली होती. जखमींनी तत्काळ जळगाव तालुक्यातील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय पथकाने जखमींवर उपचार केले.
जिल्हाभरात अनेक गावात व शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद माडला असून जिल्हाधिका-यांनी या प्रकारणात लक्ष घावाले, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







