• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

सर्जन असल्याचं भासवत बनावट शस्त्रक्रिया, 60 महिलांची फसवणूक ; जळगावच्या हेमंत सोनवणेंचे पराक्रम !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 14, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – अस्थीरोग तज्ज्ञ असल्याचं भासवून खोट्या शस्त्रक्रिया करणाऱ्या 51 वर्षीय भामट्याला वसई पोलिसांनी अटक केली. आरोपी हेमंत पाटील उर्फ ​​हेमंत सोनवणे आणि वसई-विरारचे माजी नागरी वैद्यकीय प्रमुख सुनील वाडकर यांनी मिळून अनेक बनावट शस्त्रक्रिया केल्याचा आरोप आहे. वाडकरांना गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. हेमंत सोनवणे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मसाले विकायचा. त्याने अनेक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखवले त्याने आपण अनाथ असल्याचाही दावा केला होता. ​​

हेमंत सोनवणे हा मूळचा जळगावचा रहिवासी आहे. त्याचे वडील मुरलीधर सोनवणे रेल्वे मेल सेवेत काम करत होते, त्यांचे डिसेंबर 2020 मध्ये निधन झाले. त्याची आई मालती गृहिणी होती. त्या मार्च 2018 मध्ये कालवश झाल्या. त्याची मोठी बहीण मंदा चौहान प्राथमिक शिक्षिका असून चाळीसगाव येथे राहतात. त्याचा धाकटा भाऊ हितेंद्र सोनवणे याने अभियांत्रिकी पदविका पूर्ण केली असून तो डोंबिवलीत राहतो.

हेमंत सोनवणे याने सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांना टार्गेट केले होते. “हेमंत सोनवणेला पॉर्नचे व्यसन आहे. त्याला मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे” असं सोनवणेच्या निकटवर्तीयांनी सांगितल आहे. सोनवणे त्याच्या पहिल्या पत्नीला कटनी येथे भेटला होता. त्यांना 18 वर्षांचा मुलगाही आहे. घटस्फोटानंतर तो त्याच्या आईसोबत राहतो. सोनवणेची पहिली पत्नी सरकारी इंजिनियर होती.

सोनवणेचे हॉस्पिटलमधील परिचारिकांसह जवळपास 60 हून अधिक महिलांशी अनैतिक संबंध होते, काही जणींसोबत तो लिव्ह-इन रिलेशनशीपमध्येही राहत होता. काही जणींशी त्याने लग्नही केले, असा आरोप आहे. सोनवणेच्या मोबाईलमधील काँटॅक्ट्सपैकी 90 टक्क्यांहून अधिक क्रमांक महिलांचे आहेत.

तो नेहमी म्हणायचा की तो अनाथ आहे आणि त्याला सांभाळायला कोणी नाही. पण खरं तर, जेव्हा तो मला पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याचे आई-वडील जिवंत होते, असं एका पीडित महिलेने सांगितलं.

2014 मध्ये सोनवणेशी लग्न करणाऱ्या एका डेंटिस्ट महिलेने सांगितलं की “त्याच्याशी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे माझी भेट झाली. तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे भासवत असे. एकदा तो माझ्या भावाला मुलुंडच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे तो सल्लागार होता” लग्नानंतर एका आठवड्यातच तिला कळले की त्याची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय पदवी बनावट आहेत. तिने अमरावती येथे पोलिसात फिर्याद दिली.

“सप्टेंबर 2015 मध्ये, त्याला अटक करण्यात आली आणि सुमारे नऊ महिने त्याला तुरुंगात टाकण्यात आले,” असेही डेंटिस्ट महिलेने सांगितले. काही दिवसातच तिने सोनवणेला घटस्फोट दिला. सोनवणेने मुंबईत अनेक शस्त्रक्रिया केल्या, त्या सर्व शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, असाही दावा तिने केला.

हेमंत सोनवणेने कर्नाटकातील हुबळी येथील गणिताच्या प्राध्यापक महिलेशी लग्न केले. “माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी आहे. मी ऑगस्ट 2016 मध्ये माझे वडील गमावले, आणि मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पेलू शकणार्‍या एका जबाबदार व्यक्तीच्या शोधात होते, कारण माझी भावंडे अजूनही शिकत होती” असं तिने सांगितलं. सोनवणेने तिला आवश्यक असलेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आणि ते हुबळीला गेले.

“त्याने मला सांगितले होते की तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो, पण नंतर तो मला हॉटेलची बिलं भरायला लावायचा. नंतर त्याने माझे दागिने विकले. हळूहळू, माझ्या कुटुंबाला संशय आला आणि मी त्याला सोडले. मी आता भावनिकदृष्ट्या खचले आहे.” असं प्राध्यापक महिलेने सांगितल्याचं मिड-डेच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. सोनवणेने हुबळी येथे ऑर्थोपेडिक क्लिनिक उघडले आणि बैलहोंगल, बेळगाव, मुंडगोड आणि नवलगुंड येथील अनेक हॉस्पिटलमध्ये काम केले. त्याने हुबळी-धारवाड महानगरपालिकेद्वारे चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातही काम केले आहे, असं तिने सांगितलं.

चुकलेल्या शस्त्रक्रियांनंतर नीट उभेही राहू न शकणाऱ्या 59 वर्षीय रुग्णाने हेमंत सोनवणे याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली 12 जानेवारी रोजी तिने केलेल्या तक्रारीच्या आधारे सोनवणेच्या विरुद्ध आयपीसीच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत असे नऊ जणांनी त्यांचे जबाब नोंदवले आहेत.


 

Tags: #jalgaon #mumbai #maharashtra crime
Previous Post

मेहरूण भागात १७०० रुपयांच्या नायलॉन मांजासह आरोपी पकडला

Next Post

पालकमंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पालकमंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

पालकमंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon