
जळगाव (प्रतिनिधी) – दहाव्या भारतीय छात्र संसदची विद्यार्थी परिषद निवडणूक नुकतीच पार पडली. सलग पाचव्यांदा महाराष्ट्र राज्य अध्यक्षपद जळगावने राखले असून अध्यक्षपदी जळगावचे उमाकांत राजेश जाधव हे निवडून आले. उमाकांत हे जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट येथे एम.बी.ए. चे शिक्षण घेत आहेत.
यासह जळगाव युवक जिल्हा अध्यक्षपदी जामनेर येथील दीपक पाटील (संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर) व युवती जिल्हा अध्यक्ष पदी अमळनेर येथील मानसी भावसार (प्रताप कॉलेज-अमळनेर), रायगड जिल्हा अध्यक्ष पदी जळगावातील शिवम महाजन (ऍ़ङ सिताराम बाहेती महाविद्यालय, जळगाव) हे निवडून आले. देशातील एकूण 74352 विद्यार्थ्यांनी सदर निवडणूकीत ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे मतदान केले.
निवडून आलेल्या विद्यार्थ्याचा शपथविधी सोहळा २३ ऑक्टोबर रोजी पुणे येथील एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आला आहे. निवडून आलेल्या उमेदवारांचे भारतीय छात्र संसदेचे राष्ट्रीय विद्यार्थी समन्वयक विराज कावडीया यांनी अभिनंदन केले.







