गजबजलेल्या आकाशवाणी चौकातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – बोदवड येथून जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी दुचाकीवरून येणारे बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील सचिव पंजाबराव बोरसे यांना भरधाव गॅस सिलेंडर घेवून जाणाऱ्या ट्रकने गजबजलेल्या आकाशवाणी चौकात वाहनाखाली चिरडल्याने जागीच त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची रामानंदनगर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (क्र. एमएच १९, एसी २२४) जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात पोहचले. त्या वेळी तेथे मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४ जेयु ९५९६) त्यांना जबर धडक दिली. यात बोरसे चाकाखाली आले व त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी तेथे धाव घेतली व पोलिसही तेथे पोहचले. त्यांनी रुग्णावाहिका मागवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला.
सदर घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरु होते.