जळगावातील सागर पार्क परिसरातील घटना
गुरुवारी रात्री (एमएच ०३ एएच ८५३६) ही मालवाहू रिक्षा खराब झाल्याने बंद पडली होती. त्यामुळे चालकाने रस्त्याच्या कडेला बंद रिक्षा उभी केली होती. दरम्यान मध्यरात्रीनंतर महाबळकडून आकाशवाणी चौकाकडे भरधाव कार जात होती. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कारने डिव्हायडरवरून वीज कंपनीच्या खांबाला धडक दिली. त्यानंतर कारने राँगसाईडला पलटी घेत रस्त्याच्याकडेला लावलेल्या नादुरुस्त रिक्षाला ठोस मारली. यामुळे ही मालवाहू रिक्षा उलटली. या विचित्र अपघातामध्ये रिक्षाच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज कंपनीचा खांब कारच्या धडकेत वाकून त्याचे नुकसान झाले. शुक्रवारी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वाकलेला खांब काढून नवीन खांब बसविला.
मालवाहू रिक्षाचालक प्रकाश राजपूत हे विविध हॉटेलमध्ये पापड पुरवठा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या रिक्षाच्या मदतीने त्यांचा व्यवसाय सुरू होता. अपघाताला कारणीभूत कार चालकाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी भावना रिक्षामालक चालक प्रकाश राजपूत यांनी व्यक्त केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.