धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील दोनगावाजवळील स्मशानभूमीजवळ भरधाव बसवरील ताबा सुटल्याने बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांब्यावर धडकली. घटनेत प्रवाश्यांसह शालेय विद्यार्थी असे ३१ जण जखमी झाले आहे. घटना शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. ही बस लाडली येथून निघून जळगाव येथे रेल मार्गे येत असताना घडली आहे.
धरणगाव तालुक्यातील लाडली गावात मुक्कामी असलेली बस क्रमांक (एमएच १४ बीटी २८८७) नेहमीप्रमाणे शुक्रवारी दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ५.३० वाजता लाडली येथून शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना घेऊन निघाली. पुढे रेल गावातील विद्यार्थ्यांना घेऊन पाळधीकडे येत असताना दोनगावाजवळील स्मशानभूमीच्या वळणाजवळ भरधाव बसवरील चालक अशोक जगन्नाथ पाटील (वय-५६, रा.लाडली ता.धरणगाव) यांचा बसवरील ताबा सुटल्याने वळणावरील इलेक्ट्रिक खांब्याला बस धडकली. बस थेट नाल्यात गेली असती पण सुदैवाने इलेक्ट्रिक खांब्याला धडकल्याने पुढील दुर्घटना टळली आहे. या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लाडली, दोनगाव आणि रेल गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उतरवून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार झाल्यावर बसने विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घराकडे सोडल्याची माहिती मिळाली.
जखमींची नावे
मयुरी पाटील (वय-१४), आधार सोनवणे (वय-४५), लावण्या सोनवणे (वय-११), सायली पाटील (वय-१५) हर्षा पाटील (वय-१३), गुंजन सपकाळे (वय-१६), जनाबाई पाटील (वय-५५), अजय पाटील (वय-१३), कुंदन पवार (वय-१३), सुनीता भिल (वय-४६), काजल पाटील (वय-१५), मोहिनी शारद पाटील (वय-१७), भावना शांताराम पाटील (वय-१६),अशोक जगन पाटील (वय-५७), बालाजी शंकर शिरसाट (वय-५३), कुणाल गुंजाळ पवार (वय-१३), रेखाबाई विशाल दांडेकर (वय-२५ सर्व रा. रेल ता.धरणगाव), जिजाबाई पंढरीनाथ पाटील (वय-६२), पंढरीनाथ आत्माराम पाटील (वय-६७, दोन्ही रा. लाडली ता. धरणगाव), जगन भीमराव पवार (वय-४२), विश्वनाथ सदाशिव पाटील (वय -७१), निखिल सुधाकर पाटील (वय-२३), तन्मय मंगल पाटील (वय-१९), गुंजन सुनील पाटील (वय १४), विवेक छगन पाटील (वय -१७), राम शरद अवचिते (वय-१३), जयेश चंद्रकांत पाटील (वय-१६), सायली सुरेश पाटील (वय-१७ सर्व रा. रेल ता.धरणगाव), प्रांजल संदीप पाटील (वय १४), चेतना संभाजी पाटील (वय १३) (सर्व रेल ता. धरणगाव), कीर्ती शांताराम सपकाळे (वय १५) हे ३१ जण जखमी झाले आहे.