चाळीसगाव शहरातील धक्कादायक घटना
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – येथील भाजपच्या माजी नगरसेवकावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना चाळीसगावमध्ये घडली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
प्रभाकर चौधरी असं हल्ला झालेल्या नेत्याचं नाव आहे. हल्ल्यामध्ये प्रभाकर चौधरी गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. प्रभाकर चौधरी हे चाळीसगावमधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.
चाळीसगावमधील वैष्णवी साडी सेंटरजवळ मंगळवारी रात्री चौधरी यांना अज्ञात हल्लेखोरांनी चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीर जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असून चौधरी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर चाळीसगावमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर धुळ्याच्या खासगी रूग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा हल्ला राजकीय हेतूने होता की दुसरे काही कारण होतं, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
चौधरी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध पोलिसांकडून करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी आपली पथके रवाना केलीत. चौधरी यांच्यावरील हल्ल्याचा चाळीसगावमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.