जळगावात तंट्या भिल सोसायटी येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगर व आ. सुरेश भोळे यांच्यातर्फे तंट्या भिल सोसायटी येथील गरीब बांधवांना दिवाळी निमित्त फराळ व कपडे वाटप करण्यात आले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी आ. सुरेश भोळे यांच्यावतीने भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराच्या वतीने तंट्या भिल सोसायटी येथील गरीब बांधवांना व भगिनींना फराळ साडी देऊन त्यांची दिवाळी साजरी केली. याप्रसंगी लहान मुलांचा चेहरा स्मितहास्याने फुलून गेला. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, सभापती राजेंद्र घुगे पाटील, जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई निंभोरे, सरोज पाठक, महेश चौधरी, विनोद मराठे, अतुल बारी, विठ्ठल पाटील, गजानन वंजारी, किशोर वाघ व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.