जळगाव ( प्रतिनिधी ) – भाजपच्या जिल्हा कार्यालयात महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा रेखा पाटील यांनी आयोजित केल्या बैठकीत नविन महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, शैलजा पाटील , उपाध्यक्ष सौ.सुनिता पाटील ( अंमळनेर पं.स.सदस्या ) , सौ.योगीता वानखेडे (रावेर) , सौ. विजया पाटील ( चोपडा नगरसेविका ) , जयश्री पाटील ( एरंडोल) , नुतन पाटील (भडगाव), वर्षा पाटील ( पाचोरा) , उज्वला जगधने (चाळीसगाव), अनिता शिदांड , वर्षा बारी (शिरसोली) , कृतिका आफरे ( पारोळा), साधना देशमुख (बांबरूळ ), प्रमिला चौधरी ( धरणगाव) , कविता देशमुख (पहूर ) आदी उपस्थित होत्या.
प्रास्ताविक रेखा पाटील यांनी केले सूत्रसंचालन सौ.रेखा बोंडे यांनी केले. बैठकीत जिल्ह्यातील महिला मंडल अध्यक्षा, पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.