जळगाव (प्रतिनिधी) : स्वयंस्फूर्त शिंपी समाज बहुउद्देशिय संस्था दादावाडी जळगाव तर्फे आज दि. ०४ ऑगस्ट रोजी संतशिरोमणी श्री नामदेव महाराज याचा ६७४ वा संजिवन समाधी सोहळाचे आयोजन पंचायतन मंदिर येथे करण्यात आले. सुरुवात सुश्राव्य भजनांनी होऊन भक्तीमय वातावरणात सोहळा साजरा झाला.

याप्रसंगी गंगाधर बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात संजय चुनिलाल अहिरराव, स्वागत अध्यक्ष,राजेंद्र सोनवणे, अध्यक्ष शिंपी समाज हितवर्धक संस्था विवेक जगताप, मनोज भांडारकर, डि आर शिंपी, सुधाकर शिंपी यांची प्रमुख उपस्थिती होती. दिपप्रज्वलन, प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी रेखाताई निकुंभ, शिंपी समाज शहर महिला अध्यक्षा स्वरांजली शिंपी, दादावाडी महिला उपाध्यक्षा तसेच संस्था उपाध्यक्ष राजेंद्र गुलाब सोनवणे, जितेंद्र जगताप, कार्याध्यक्ष, किशोर शिंपी, कोषाध्यक्ष, नामदेव शिंपी, सहसचिव, शैलैंद्र मांडगे सल्लागार, तुळशीदास निकुंभ, सल्लागार व हितवर्धक संस्थेचे पदाधिकारी ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी शिवदास सावळे, दिनेश बाविस्कर, प्रविण बाविस्कर, सुधीर मेटकर, गुणवंत शिंपी, राजेंद्र कापडणे, प्रविण शिंपी व इतर कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.









