जिल्हापेठ पोलिसांकडून ‘बटाट्या’ला दाखविला खाकीचा इंगा
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने इंस्टाग्राम या समाजमाध्यमांवर भाईगिरी करणाऱ्या तरुणावर कारवाई केली असून त्याला एका गुन्ह्यात अटकदेखील केली आहे. शहर पोलीस स्टेशनच्यानंतर आता जिल्हापेठ पोलीस स्टेशनने भाईगिरीची रील टाकणाऱ्या तरुणावर कारवाई केल्याने शहरातील “भाईं”ना धडा बसला आहे.


चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशीर (वय २२) असे कारवाई झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका गुन्ह्यात तो जिल्हापेठ पोलिसांना हवा होता.(केसीएन)या गुन्ह्यात त्याला अटक झाल्यावर तपासात त्याने इंस्टाग्रामवर, “कमजोर, और हम ? ना कभी थे…वक्त का इंतजार किजीये..!” या डायलॉगची भाईगिरीची रील व्हायरल केल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली. यापुढे भाईगिरीची रील करणार नाही असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.









