जळगाव (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते व युवा राजकीय कार्यकर्ता सूरज विजय नारखेडे यांचा शनिवारी दि. १५ जून रोजी रेडिओ ऑरेंजतर्फे ‘यंगिस्तान अवार्ड” देऊन अभिनेत्री माधुरी पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जळगाव तालुक्यातील भादली येथील रहिवासी सूरज विजय नारखेडे यांनी सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मानवाधिकार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच, राजकीय पटलावरदेखील उत्कृष्ट कार्य करून लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यामुळे त्या कार्याचा गौरव म्हणून सूरज नारखेडे यांचा “अल्याड पल्याड” सिनेमातील कलाकारांच्या उपस्थितीत व अभिनेत्री माधुरी पवार यांच्याहस्ते ‘यंगिस्तान अवार्ड” देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून कौतुक करण्यात येत आहे.