जळगाव (प्रतिनिधी) : विभागातील भादली ते जळगाव रेल्वे मार्गावरील समपार फाटक क्र. १५० (लेव्हल क्रॉसिंग गेट), मन्यारखेडा येथील गेटचे कार्य आणि रस्त्याच्या कामासाठी पूर्णतः बंद करण्यात येत आहे.
समपार फाटक क्र. १५० (किमी. ४२४/२१-२३) दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २१ दिवसांकरिता (२४ ऑक्टोबरपर्यंत) बंद करण्यात येईल. या फाटकाच्या बंदमुळे नागरिकांना वैकल्पिक मार्गांचा वापर करावा लागणार आहे. कृपया सर्व नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन कृपया वैकल्पिक मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे भुसावळ विभागाने केले आहे.