भडगाव (प्रतिनिधी) – आगामी काळात येणा-या सणोत्सवमध्ये डी. जे. बँड इ. सर्व नियम व अटींचे पालन करुन वापरण्याचे पोलीस प्रशासनाकडुन वारंवार सुचना देवुनही कर्कश आवाजाचे डी.जे. वाजवुन सार्वजनिक शांतता बिघडवणा-या विरुध्द भडगांव पोलीसांनी कारवाई केली.
18 रोजी रात्री 10.30 वा. सुमारास भडगांव शहरातील बाळद रोड येथे डी.जे. लावुन मोठया आवाजात विनापरवाना मिरवणुक सुरु असताना सहायक पोलीस अधीक्षक चाळीसगांव अभयसिंह देशमुख , पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील असे मिरवणुकीच्या ठीकाणी पोहचले. सदर ठिकाणी एक आयशर गाडी क्र.MH 43 F 8058 हीच्या रचनेत बदल करुन डी.जे. बसवुन विनापरवाना आवाजाच्या डेसीबल मर्यादेचे उल्लंघन करुन डी जे वाजविताना मिळुन आला, म्हणुन सदरची डीजेची गाडी भडगांव पोलीस स्टेशनला आणुन पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक डोमाळे यांनी या बाबत परिवहन कार्यालय, जळगांव विभागाशी आवश्यक पत्रव्यवहार केला असता त्यांचेकडुन डी. जे. मालक तुषार पाटील व राकेश बाग दोघे रा. भडगांव यांना 44 हजार रुपये इतका आर्थीक दंड करण्यात आला आहे.
तरी सर्व गणेश मंडळ तसेच डी. जे. धारक यांना भडगाव पोलीस स्टेशनकडुन सुचना व आवाहन करण्यात येत आहे की, सार्वजनिक मिरवुणकीमध्ये डी जे वाजविताना वेळेचे व डी जे च्या आवाजाच्या मर्यादेबाबत मा. सुप्रीम कोर्टाने घालुन दिलेल्या नियमांचे व RTOच्या नियमांचे पालन तंतोतंत पालन करण्यात यावे. अन्यथा अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येतील बाबत भडगांव पोलीस स्टेशन कडुन आवाहन करण्यात आले आहे.