भडगाव पोलीस स्टेशनची दमदार कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव पोलीस स्टेशनला दाखल दुचाकी चोरीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेश व गुजरात मधील गावांमधून दुचाकी चोरी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आले आहे.
अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या मालकीचे ३५ हजार रुपयाची दुचाकी क्र. एम.एच. १९ डी क्यू ५९९५ ही दिनांक १३ रोजी रात्री ते दि.१४ रोजी सकाळी ०६ वाजताच्या दरम्यान फिर्यादीच्या घरासमोरुन चोरुन नेली होती.(केसीएन)भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा फिर्यादी पंडीत झिपरु बोरसे वय. ४७ रा. गिरड ता. भडगाव यांचे फिर्यादवरुन दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे तपास करीत असतांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने बातमी मिळाली.
सदर गुन्ह्यातील चोरी केलेली मोटार सायकल ही अमोल शांताराम पाटील रा. गिरड ता. भडगाव याने चोरी करुन घेवुन गेला आहे. त्यास पोलिसांनी ताब्यात घेवुन गुन्ह्यातील चोरी केलेली मोटारबाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली. त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. (केसीएन)त्यास दि.१८ जुलै रोजी रात्री ८ वाजता अटक करण्यात आली. सदर आरोपी यास न्यायालयात हजर करुन त्याची ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेवुन विचारपुस केली असता त्याने सदर दाखल गुन्ह्यातील चोरुन नेलेल्या मोटार सायकल व्यतिरीक्त गुजरात, मध्यप्रदेश राज्यातुन व पाचौरा परिसरातून अजुन मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सदरच्या मोटर सायकली गुन्ह्यात आरोपीने सांगितल्याने त्या देखील जप्त करण्यात आल्या. एकुण २ लाख ८५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. सदरची कार्मागरी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो. उपनिरी, शेखर डोमाळे, पोहे कॉ किरण रविंद्र पाटील, हिरालाल नारायण पाटील, पोहेको निलेश भालचंद्र ब्राम्हणकर, पोना मनोहर पाटील, पोको सुनिल राजपुत, पोको प्रविण परदेशी यांनी केली असुन गुन्हाचा पुढील तपास पोहेकी किरण रविंद्र पाटील हे करीत आहेत.