जळगाव ( प्रतिनिधी ) – एका पायाला झालेल्या गंभीर जखमांमुळे चालणेही शक्य नसलेल्या आणि आकाशवाणी चौकात बेवारस पडलेल्या व्यक्तीला आज नारीशक्ती ग्रुपची जागरूकता आणि धावपळीमुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
नारीशक्ती गृपच्या अध्यक्ष मनीषा पाटील , सुमित्रा पाटील , विनोद जाधव , पत्रकार सोनम पाटील यांनी या बेवारस रुग्णाबद्दल जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला माहिती देऊन रुग्णवाहिका आणि सहकारी कर्मचाऱ्यांना बोलावले होते. डॉ. संदीप परदेशी, रुग्णवाहिकेचे ( एम एच १४ – सी एल ७९२ ) चालक किशोर शिरोळे यांनी आकाशवाणी चौकातून या रुग्णाला रुग्णवाहिकेतून नेले .