पथनाट्यातून केली जनजागृती, विधी सेवा समितीचा उपक्रम
पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ आणि श्री. गो.से. हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने बेटी बचाओ बेटी पढावो अभियानांतर्गत पाचोरा शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीतून आणि संघर्ष गाथा या पथनाट्यातून शालेय विद्यार्थिनींनी बेटी बचाव बेटी पढावच्या घोषणा देत जनजागृती मोहीम मोहिमेत सहभाग नोंदविला.देण्यात आला.
कायदेविषयक विधी साक्षरता शिबिर कार्यक्रमांतर्गत सकाळी नऊ वाजता पाचोरा न्यायालय परिसरातून विद्यार्थ्यांची भव्य रॅली निघाली. या रॅलीमध्ये विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी इतिहासातील झाशीची राणी,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्यासारख्या महान स्त्रिया तसेच वर्तमान काळातील राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्यासह विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांच्या वेशभूषेत सहभाग नोंदवला. स्त्री शिक्षणाचे महत्त्व तसेच स्त्री भ्रूणहत्या विरोधात जनजागृती करणारे फलक हातात घेत आणि घोषणा देत विद्यार्थिनीनी जनजागृती केली.
त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅली आल्यानंतर दिवाणी न्यायाधीश क.स्तर जी.बी.औंधकर यांचे अध्यक्षतेखाली आणि सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर श्रीमती एम. जी. हिवराळे,दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर एल. व्ही.श्रीखंडे, पाचोरा तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रवीण पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत विद्यार्थिनींनी महेश कौंडिण्य लिखित आणि दिग्दर्शित संघर्षगाथा या पथनाट्याने रसिकांचे मनोरंजनातून उदबोधन करत मने जिंकली.सागर थोरात यांनी पथनाट्याला संगीत साथ दिली. प्रणवी पाटील, प्राची मिसाळ,महिमा चौधरी, सिद्धी चिंचोले, सिद्धी पाटील, ऐश्वर्या ढवळे,अनुष्का महाजन यांनी पथनाट्यात सहभाग नोंदवला.महेश कौंडिण्य आणि अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.प्रवीण पाटील यांनी केले तर कार्यक्रमाला ॲड. एस.पी.पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले, गो.से. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पी.एम. वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर.ठाकरे, पर्यवेक्षक ए.बी.अहिरे ,यांचे सह उपशिक्षक संजय करंदे, आर.बी. कोळी,प्रमोद पाटील, सागर थोरात, संदीप मनोरे, चंदा चौधरी, स्वाती वाघ यांचे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.