अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- एका मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन यांचे पथकाने बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणीमध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा २७९२ किग्रॅ वजनाचा एकूण ३ लाख ३१ हजार ४४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.
ही कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी के.एच.बाविस्कर, श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ.कांबळे व सह आयुक्त,(नाशिक विभाग) म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्या करण्यात येणार असून स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणाऱ्या दुकानांविरोधात तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.