जळगाव ;- किरकोळ कारणावरून एकाने तरूणावर जीवघेणा चाकूहल्ला केल्याची घटना आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आसोदा येथे घडली. जखमी तरूणास जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, राहुल कैलास पाटील (वय-२४) रा. आसोदा ता.जि.जळगाव हा आसोदा येथील हॉटेलचा कारागीर आहे. शासकीय आदेशानुसार सर्व हॉटेल बंद असल्यामुळे राहुल पाटील हा घरीच होता. आज सकाळी ११.३०वाजेच्या सुमारास गल्लीत राहणारा संतोष येळकोट माळी हा दारू पिऊन शिवीगाळ करायला लागला. त्यावर शिवगाळ का करतो असा जाब विचारल्याचा राग आल्याने संतोष माळी याने कांदा कापण्याच्या चाकूने वार करून दोन्ही हात जखमी केले. यात राहूलच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे ‘ सांगितले. जखमी आवस्थेत जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप पोलीसात कोणतीही तक्रार दाखल केले नाही.