• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंप्राळ्यात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारणार – महापौर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 4, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

अग्निशमन सैनिक दिनानिमित्त कर्मचार्‍यांचा सत्कार

जळगाव;- कोणत्याही आपत्ती निवारणप्रसंगी अतिशय धैर्याने व प्रशिक्षणाने आगीपासून जीव व मालमत्ता वाचविणारे तसेच यापासून होणार्‍या दुष्परिणामांची तीव्रता कमी करणारे अग्निशमन सेवेचे सेवेकरी हे खर्‍या अर्थाने ‘सैनिक’च असतात. त्या अनुषंगाने शहरातील वाढत्या नागरी वस्त्यांचे क्षेत्र लक्षात घेता पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल, असे आश्वासन महापौर सौ.जयश्री महाजन यांनी आज दिले.

जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रात जाऊन केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी त्या बोलत होत्या. उपमहापौर कुलभूषण पाटील यावेळी उपस्थित होते.

महापौर सौ.जयश्री महाजन यांनी सुरूवातीला अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांप्रती ते देत असलेल्या उत्तम सेवेबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या विविध सेवा-सुविधा देताना येणार्‍या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी सद्यःस्थितीत या केंद्राकडे जुन्या 3 व नव्या 4 अशा एकूण 7 फायर फायटर गाड्या उपलब्ध असून, एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी केली. तसेच उपकरण खरेदीसंदर्भातही चर्चा केली. त्यानंतर सौ.महाजन म्हणाल्या, की शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन तुमच्यावरील कामाचा ताण कमी करण्याच्या अनुषंगाने पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल. उपकरण खरेदीचा विषय या महिनाअखेर सोडविला जाईल. त्यासाठी 50 लाखांपर्यंत तरतूद केलेली आहे. खासदार मा.श्री.उन्मेष पाटील व आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांच्या उपस्थितीत एमआयडीसी अधिकार्‍यांसमवेत डिसेंबर 2020 मध्ये बैठक झाली होती, त्यात एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे केंद्र एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय होऊन ते त्यांच्याकडे कार्यान्वित झाले आहे. तुमच्या केंद्रासाठी नव्या जागेचा शोध सुरू आहे, हा प्रश्नही लवकर निकाली काढला जाईल.


 

 

Previous Post

देखभाल करण्यासाठी सुट्टी मिळत नसल्याने पोलीस अधिकाऱ्याचा राजीनामा

Next Post

जळगावात लपून छापून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानांवर सीलची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात लपून छापून व्यवसाय करणाऱ्या ११ दुकानांवर सीलची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon