जळगाव;– येथील देवा तुझा मी सोनार संघटना, प्रमोद विसपुते, पातोन्डेकर ज्वेलर्सचे संचालक किरण पातोन्डेकर यांच्याकडून कोरोना या जीवघेण्या आजारापासून बचाव कसा करावा व स्वतःचे रक्षण कसे करावे, याची वेळोवेळी माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जनतेचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता ,परिवाराची काळजी न घेता अहोरात्र रस्त्यावर येवून काम करित असणारे सर्व पोलीस कर्मचारी, पत्रकार,व अत्यावश्यक सेवा पुरवणारे सर्व कर्मचारी, शासकीय अधिकारी व तहसील कार्यालय सर्व कर्मचाऱ्यांना मास्क, हँन्ड ग्लोज, सॅनिटायझरचेे वाटप केेले आहे. आतापर्यंत संपूर्ण जळगाव शहरातून 1500 मास्क,1500 हँन्ड ग्लोज, व 200 सॅनिटायझरचेे वाटप केले आहेत. पुढेही हे काम संघटनेमार्फत करण्यात येईल, असे पातोन्डेकर ज्वेलर्सचे संचालक किरण पातोन्डेकर यांनी सांगितले.