मुक्ताईनगर;- बोदवड रस्त्याला लागून असलेल्या वन विभागाच्या जंगल हद्दीत मोठ्या प्रमाणात गोवंश मृत अवस्थेत फेकण्यात आलेले आहे…! या रस्त्याने मुक्ताईनगर कर दररोज सकाळ संध्याकाळ फिरायला येत असतात . त्यांच्या जीवाशी हा खेळ असून भारतात गोवंश हत्या बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल कुणी केली हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे. या सततच्या होणाऱ्या गुरे वाहतूकिला लगाम लागावा अन्यथा हिंदुत्ववादी संघटना तीव्र स्वरूपात निषेध करतील अशा स्वरूपाचे निवेदन तहसील कार्यालय मुक्ताईनगर, व पोलीस स्टेशन मुक्ताईनगरला देण्यात आले . या वेळी पंकज कोळी , adv राहुल पाटील ,दीपक झांबरे, शुभम तळेले, प्रफुल्ल वंजारी, भूषण वानखेडे, सागर जाधव, राहुल शूरपाटने, धनंजय सापधरे, योगेश चौधरी, रोहित बोदडे, दीपक तायडे, विजय पोलाखरे इत्यादी उपस्थित होते.