जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मागील वर्षांपासून कोरोनाच्या भीतीपोटी अनेक नातेवाईकांनी आपल्या मृत नातेवाईकाकडे पाठ फिरवून त्यांचे अंत्यविधीसुद्धा टाळल्याच्या घटना घडल्या होत्या. याबरोबरच काही बेवारस मृतदेह यांच्यावर अंत्यसंसकार करण्याची हिमंत करणाऱ्या विद्यार्थ्यानी आपल्या जीवाची पर्वा न करता हि जबाबदारी पेलत माणुसकीचे दर्शन घडवून शंभराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंसकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महेश्व्री सभेतर्फे सत्कार करण्यात आला.
मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर आदी विद्यार्थी मार्च २०२० पासून निःस्वार्थपणे समाजाची सेवा करणाऱ्या या कोरोना योध्या विद्यार्थ्यांचा माहेश्वरी सभेतर्फे श्याम कोगटा, माहेश्वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याला सलाम केला. यावेळी गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अॅड.राहुल झंवर, विनोद न्याती, बी.जे.लाठी, अॅड.दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.








