नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी टॅक्सी सेवा देणाºया उबरने देशात ६०० कर्मचारी कमी असल्याचे जाहीर केले. कोरोना संसर्गामुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे कारण कंपनीने या नोकरकपातीसाठी दिले आहे. यापूर्वी उबरची स्पर्धक असलेल्या ओलाने टॅक्सीसेवा, वित्तसेवा व खाद्यपदार्थ व्यवसायातून १४०० जणांना सोडचिठ्ठी दिली होती.
नेमक्या कोणत्या स्तरावर ही नोकरकपात झाली आहे, याबाबत उबरला विचारले असता कंपनीने सांगितले की, वाहनचालक, चालकाचे सहाय्यक आणि अन्य पदांवरील व्यक्तींमध्ये ही कपात करण्यात आली आहे. कोरोना व लॉकडाऊन यांमुळे उबरच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाल्यामुळेच कंपनीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे उबर इंडिया व दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रदीप परमेश्वरन यांनी सांगितले आहे.