कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. दिल्लीसारख्या काही राज्यांमध्ये भयावह स्थिती आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन, कर्फ्युसारखे उपायही निष्प्रभ ठरत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागारांनी भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाची तिसरी लाट अटळ असून ती कधीही येऊ शकते, असे सांगतानाच ‘सतर्क रहा’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजय राघवन यांनी एका पत्रकार परिषदेत हा इशारा दिला. कोरोना विषाणूची नवनवीन स्वरुपे दिसू लागली आहेत.







