चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मेहुणबारे गावानजीक अक्कलकुवा ते चाळीसगाव दरम्यान बसमध्ये प्रवास करत असतांना एका महिलेच्या बॅगेतून ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १ मार्च रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्वाती मोहन परदेशी (वय ३२ रा. धुळे) या फिर्यादी आहे. या महिला कामाच्या निमित्ताने गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अक्कलकुवा ते चाळीसगाव असा बसमध्ये प्रवास करत असतांना मेहुणबारे गावाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या सीटच्या खाली ठेवलेल्या बॅगेतून ६२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. हा प्रकार महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय शिंदे करीत आहे.