चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – बसमध्ये चढताना विद्यार्थ्याचा खिशातून ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश्वर सुखदेव घुले (वय-२३ , रा. वडी रामसगाव ता. घनसांवांगी ) हा तरूण २५ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहरात आला होता. सकाळी चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. बसमध्ये बसल्यानंतर महेश्वर घुले यांना हा प्रकार लक्षात आला. घुले यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना दिपक पाटील करीत आहे.