बोदवड पोलिसांनी दखल न घेतल्याने न्यायालयामार्फत झाला गुन्हा नोंद
हरीश सुरेश डापसे (वय २९) या तरुणाचे शेलवड येथे ऑनलाइन सेवा केंद्र आहे. त्याने २१ रोजी दुपारी बोदवड येथील बँकेतून साठ हजारांची रक्कम काढून शेलवड गावी बसने जाण्यासाठी बोदवड बस स्थानकात उभा असताना दुपारी ३ वाजता बसमध्ये (एम. एच. ४० एन. ९०३९) चढत असताना त्यांच्या खिशात असलेले ५० हजार रुपयांचे बंडल अज्ञात चोरट्याने काढून घेतले. हा प्रकार बसमध्ये चढल्यानंतर त्याच्या लक्षात आल्याने बाबत बोदवड पोलिस ठाण्यात गेला असता, तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर २२ रोजी हा तरुण परत पोलिस ठाण्यात गेला असता तक्रार न घेतल्याने या तरुणाने न्यायालयामार्फत कलम १५४ अंतर्गत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.