धरणगाव तालुक्यातील जांभोरा येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील जांभोरा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने १ बैल जागीच ठार झाला तर शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घरी आहे. जखमी झालेल्या शेतकऱ्याला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात बसचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील जांभोरा गावात राहणारे शेतकरी गोपाल केशव अहिरे (वय-५५) हे गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास शेतातून काम आटपून बैलगाडीने घरी परतत असताना समोरून येणारी बस क्रमांक (एमएच २० बी एल ३३६३) ने जोरदार धडक दिली. या धडकेत बैल जोडीतील एक बैल ठार झाला तर शेतकरी गोपाल अहिरे यांचे दोन्ही पाय निकामी झाले आहे.
जखमी झालेल्या शेतकऱ्याला तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बसचालक आयुब शेख चांद पिंजारी रा.एरंडोल यांच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पवन कुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.